शिवसेनेच्या वायरी भूतनाथ जि. प. मतदार संघ उपविभाग प्रमुखपदी दत्तात्रय चोपडेकर…

⚡मालवण ता.३१-:
शिवसेना पक्षाच्या वायरी भूतनाथ जि. प. मतदार संघाच्या उपविभाग प्रमुख पदी देवबाग येथील दत्तात्रय चोपडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे नियुक्तीपत्र आमदार निलेश राणे यांच्या हस्ते आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत दत्तात्रय चोपडेकर यांना देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शिवसेना शहाराध्यक्ष दीपक पाटकर, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, मंदार लुडबे, महेश सारंग, अरुण तोडणकर, प्रीतम गावडे यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page