⚡सिंधुदुर्गनगरी ता ३१-: सिधुदुर्ग जिल्ह्यात १०० किमी अंतराचा लांब पल्ल्याच्या रेल्वे ट्रॅक असतानाही जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर थांबत नसतील तर हा आमच्या सिंधुदुर्ग आणि कोकण वाशीयांवर अन्याय आहे. परराज्यातून जाणाऱ्या गाड्या सिंधुदुर्गात थांबाव्यात. मडूरा ते दादर आणि सावंतवाडी सी एस टी या नवीन गाड्या २० ऑगस्ट पूर्वी सुरू कराव्या. आदी मागण्यांसाठी १ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष व समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर व जिल्हा समन्वय नंदन वेंगुर्लेकर यांनी दिली. दरम्यान, या प्रश्नावर रेल्वे बोर्ड आणि रेल्वे प्रशासन दखल घेत नाही. चर्चेसाठी आलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत योग्य तोडगा निघाला नसल्याने आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सरपंच, रिक्षा संघटना, ग्रामस्थ प्रवाशांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष व समन्वय समितीने आवाहन केले आहे.
सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्टेशनवर उद्या रेल्वे रोको आंदोलन…
