कणकवली शहरातील आचरा रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी निविदा प्रसिद्ध…

पावसामुळे काम करणे शक्य नव्हते ; मात्र आता दोन दिवस वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवून काम सुरू होणार:नगरपंचायत मुख्याधिकारी श्रीम. गौरी पाटील यांची माहिती..

⚡कणकवली ता.२७-: कणकवली नगरपंचायत हद्दीतील आचरा रोड व इतर ठिकाणी पडलेले खड्डे बुजविण्याचे नियोजन कणकवली नगरपंचायत मार्फत करण्यात आलेले असून त्या करीत निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आचरा रोड हा वर्दळीचा रस्ता असल्याने पोलीस प्रशासनाच्या मदतीने येथील खड्डे रात्री उशिरा किंवा २ दिवस सदर रस्ता बंद ठेवून करण्यात येणार आहे. सदर रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम नगरपंचायत मार्फत हाती घेण्यात आले होते, परंतु पावसामुळे काम करणे शक्य झालेले नाही. पण आता निविदा प्रक्रिया नंतर तत्काळ सदर काम करण्यात येईल असे कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी श्रीम. गौरी पाटील यांनी सांगितले.

You cannot copy content of this page