⚡कणकवली ता.२३-: कासार्डे धुमाळवाडी येथील जंगलमय भागात अजय हरिश्चंद्र कदम ( वय 47 रा.कासार्डे धुमाळवाडी ) याच्या ताब्यातून गोवा बनावटीची 3 हजार 300 रुपयांची अवैध दारू कासार्डे दुरक्षेत्राच्या पोलिसांनी पकडली. कासार्डे धुमाळवाडी येथील जंगलमय भागात झाडाखाली अजय कदम याच्या ताब्यातील अवैध दारू हवालदार चंद्रकांत झोरे, कॉन्स्टेबल स्वप्नील जाधव यांनी पकडली. 23 जुलै रोजी दुपारी 3 वाजता ही कारवाई करण्यात आली. कॉन्स्टेबल स्वप्नील जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अजय कदम विरोधात कणकवली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासार्डेत पकडली गोवा बनावटीची अवैध दारू
