कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त माजीसैनिक संघ, शाखा कुडाळ यांच्या वतीने वेताळबांबर्डे येथील शोषित मुक्ती अभियान संस्था व “नाग्या म्हादू” निवासी वसतिगृहास वॉशिंग मशीन भेट देण्यात आली.
वेताळ बांबर्डे येथे कातकरी व आदिवासी समाजाच्या मुलांसाठी “नाग्या महादू” नावाने निवासी वसतिगृह आहे. सदर वसतिगृहामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८६ मुले व मुली वास्तव्यास आहेत. या वसतिगृहास कुडाळ शाखा माजीसैनिक संघटनेने १५ दिवस अगोदर भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष उदय लवू आईर यांच्याकडून वसतिगृहामधील अडीअडचणी बाबत माहिती घेतली. त्यांनी मुलांचे कपडे धुणे व सध्या पावसाळ्यामध्ये वाळविणे ही समस्या असल्याचे सांगितले. यावर माजीसैनिक संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत वसतिगृहास आज वॉशिंग मशीन भेट दिली.
यावेळी मुलानी देशभक्ती गीत सादर केले. यावेळी पी. टी. परब यांनी मुलांना शैक्षणिक, सामाजिक, देश प्रेम याबद्दल माहिती दिली. तसेच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सिंधुदुर्गचे वतीने जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी अमूल्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात मुलांना खाऊ वाटप केले. कार्यक्रमास संघटना अध्यक्ष श्यामसुंदर सावंत, सदस्य बाळकृष्ण चव्हाण, पी. टी. परब, मारुती गावडे, तानाजी बागवे, भास्कर नाटळकर आदी उपस्थित होते. या संस्थापक उदय आईर यांनी माजीसैनिकांच्या या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.
सेवानिवृत्त माजीसैनिक संघाच्या वतीने “नाग्या म्हादू” वसतिगृहास वॉशिंग मशीन भेट..
