⚡मालवण ता.१८-:
आचरे येथील न्यू इंग्लिश स्कूल आचराचे इयत्ता आठवीचा विद्यार्थी कु सुयश सदगुरु साटेलकर याने
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन करत जिल्ह्यामध्ये सातवा क्रमांक मिळविला तर इयत्ता पाचवी स्कॉलरशिप जिग्नेश चंद्रशेखर भोसले याने यश संपादन केले. दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशाने शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदीप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदीप गोपाळराव परब मिराशी, यांसह सर्व मुंबई समिती पदाधिकारी सदस्य, स्थानिक समिती च्या निलिमा सावंत, राजन पांगे, बाबाजी भिसळे, अर्जुन बापर्डेकर, रघुनाथ पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल आचराचे सुयश…!
