वेंगुर्ला प्रतिनिधी- उभादांडा-बागायतवाडी येथे वेंगुर्ला पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये येथील प्रसाद प्रकाश तुळसकर (वय ३२) याच्या जवळ सुमारे ११ हजार रुपये किमतीचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला. मुद्देमालासह पोलिसांनी त्याला रात्री ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग मोहन दहिकर, सावंतवाडी विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू आहे. वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी आपल्या पथकासह तालुक्यात याबाबत कारवाई करत असताना रात्री मिळालेल्या माहितीनुसार उभादांडा-बागायतवाडी येथे अंमली पदार्थ मिळून आला आहे. त्यामुळे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमानुसार प्रसाद तुळसकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकामध्ये पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड, पोलीस हवालदार योगेश सराफदार, योगेश राऊळ, चालक श्री.जोसेफ, पोलीस नाईक स्वप्निल तांबे, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग खडपकर, मनोज परूळेकर, प्रथमेश पालकर, जयेश सरमळकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल गौरी तामनेकर, होमगार्ड धुरी, गिरप आदी सहभागी झाले होते. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करत आहेत.
फोटोओळी – गांजाप्रकरण प्रसाद तुळकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले.