“सिंधूदुर्ग कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागाची जिल्ह्यात बाजी “…

“सिंधुदुर्ग कॉलेजची अर्थशास्त्र विभागाची चैताली कुणवळेकर जिल्ह्यात पहिली आणि लक्ष्मी पारकर दुसरी”..

मालवण दि प्रतिनिधी
मालवणच्या स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील तृतीय वर्षी अर्थशास्त्र विषयामध्ये टी वाय बी ए या वर्गात शिक्षण घेत असलेल्या चैताली कुणकवळेकर ही विध्यार्थीनी जिल्ह्यामध्ये ९.५८ ग्रेड घेऊन जिल्ह्यात पहिली तर लक्ष्मी पारकर ही विध्यार्थिनी ९.४३ ग्रेड घेऊन जिल्ह्यात दुसरी आलेली आहे. त्याचबरोबर कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागाचा निकालही शंभर टक्के लागलेला आहे.

मालवणच्या स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील तृतीय वर्ष अर्थशास्त्र विषयामध्ये शिक्षण घेणाऱ्या चैताली कुणकवळेकर आणि लक्ष्मी पारकर या विद्यार्थिनीना अर्थशास्त्राचे प्रा. डॉ. डी व्ही हारगिले, प्रा. डॉ मल्लेश खोत, प्रा. प्रमोद खरात यांचे मार्गदर्शन लाभले. अर्थाशास्त्र विषयात प्राविण्य मिळवणे कठीण असते तरीसुद्धा सिंधुदुर्ग कॉलेजच्या या विद्यार्थिनींनी 9.58 इतक्या ग्रेड मिळवून जिल्ह्यात आणि युनिव्हर्सिटी मध्ये अव्वल स्थान निर्माण केलेले आहे त्याबद्दल प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या यशस्वी विद्यार्थिनीचे कृ सी देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सीडीसी अध्यक्ष समीर गवाणकर, सेक्रेटरी गणेश कुशे, शालेय समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण, कृ सी देसाई शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले आहे

You cannot copy content of this page