सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी बांदा पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला…

⚡बांदा ता.२५-: बांदा पोलीस ठाण्यात आज दुपारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी कार्यभार स्वीकारला. बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची जिल्हा विशेष शाखा ओरोस येथे बदली झाली आहे. पालवे यांचे बडवे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
निरीक्षक बडवे यांनी दीड वर्षे बांदा पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळला. आपल्या सेवा काळात त्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी निश्चितच प्रयत्न केलेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे हे दीड वर्षे कुडाळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. आज त्यांनी बांदा पोलीस ठाण्याचा कार्यभार हाती घेतला. यावेळी त्यांचे पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांनी स्वागत केले तर पोलीस निरीक्षक बडवे यांना निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
फोटो:-
बांदा पोलीस ठाण्याचे नूतन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना पोलीस निरीक्षक विकास बडवे. (छायाचित्र – नीलेश मोरजकर)

You cannot copy content of this page