देऊळवाडा येथील मातीचा भराव काढून टाकून मोरी खुली करावी…

ह्युमन राईट्स असोसिशन फॉर प्रोटेक्शनची मागणी..

⚡मालवण ता.२४-:
मालवण देऊळवाडा येथे बांधलेल्या मोरीच्या तोंडावर मातीचा भराव टाकून ती बुजविण्यात आल्याने भरडेवाडा व आडवण येथून येणारे पावसाचे पाणी अडले जाऊन तेथील घरांना धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हा भराव काढून टाकावा, अशी मागणी ह्युमन राईट्स असोसिशन फॉर प्रोटेक्शन, मालवण तर्फे मालवण नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली.

याबाबतचे निवेदन मालवण नगरपालिका अधिकाऱ्यांकडे देण्यात आले. यावेळी ह्युंमन राईट्स असोसिशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, तालुका अध्यक्ष प्रमोद कांडरकर, उपाध्यक्ष महेश मयेकर, निरीक्षक संदेश फाटक सचिव विनोद वेंगुर्लेकर, सुनील फाटक आदी उपस्थित होते.

मालवण देऊळवाडा येथील कवटकर घर ते बर्फ फॅक्टरी दरम्यान मालवण स्टॅन्ड ते कसाल रस्त्याला पावसाचे पाणी जाण्याची मोरी सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेली होती. त्या मोरीतून भरडेवाडा व आडवण येथून वाहून येणारे पावसाचे पाणी त्या मोरीतून वाहून जायचे. मात्र आता त्या मोरीच्या तोंडावर मातीचा भराव टाकून ती बुजविण्यात आली आहे. त्यामुळे पावसात तेथील रहिवाश्यांच्या घरांना धोका निर्माण होवू शकतो. तसेच उत्पन्नाची झाडेही उन्मळून पडण्याची शक्यता आहे. हा भराव काढून टाकून मोरी खुली करावी, ही मोरी खुली न केल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार मालवण नगरपालिका राहील असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच वायरी मुस्लीम मोहल्ला ते दिघे डॉक्टर यांच्या घरासमोरून महाराजा हॉटेल पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यातील पाणी वाहण्याचा मार्ग गटारातून बंद झालेला आहे, तो त्वरीत खुला करून देण्यात यावा व गटारातील मातीचे भराव टाकून बुजविलेली गटारे खुली करावीत, अशीही मागणी निवेदनात केली आहे.

You cannot copy content of this page