पाटगाव परिसरातील सहकारातील कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांचा भाजपात पक्षप्रवेश…

कणकवली
देवगड युथ फोरमचे अध्यक्ष आणि देवगडमधील युवा विधी तज्ञ अॅड. सिद्धेश अविनाश माणगांवकर यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. या वेळी माजी आमदार अजित गोगटे उपस्थित होते. अॅड. माणगांवकर यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून पाडगाव परिसरातील तसेच सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आणि युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग राहिला.

विजय गुरव (अध्यक्ष – पावनादेवी देवस्थान कमिटी, पाटगाव), माजी सरपंच श्रद्धा गुरव, दत्ताराम गुरव (विश्वस्त – पावनादेवी देवस्थान कमिटी, पाटगाव), प्रदीप गुरव (माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक – वेळगीवे शेती विकास संस्था), संदीप गुरव (उपसरपंच – पाटगाव), विकास गुरव (अध्यक्ष – गावठण वाडी, पाटगाव), मंगेश गुरव (सचिव – गावठण वाडी, पाटगाव), तसेच विकास तेली आणि विनय पराडकर यांचा सहभाग आहे.

पाटगाव येथील विजय लक्ष्मण गुरव, दत्ताराम रामचंद्र गुरव, श्रद्धा शंकर गुरव, प्रदीप सीताराम गुरव, विकास सीताराम गुरव, विजय वसंत गुरव, मनोहर लक्ष्मण गुरव, गोविंद श्रीताराम गुरव, विजय हरि गुरव, संतोष सीताराम गुरव, लक्ष्मण गोविंद गुरव, विश्वास तिलक गुरव, अनिल कुमार गुरव, विनोद देशराम गुरव, सुनील झडे गुरव, अविनाश कुशाब गुरव, नाथूळा देशराम गुरव, गणपत चिंधू घमरे, नितीन संतोष गुरव, महेंद्र पांडुरंग गुरव, अनंता बाबळा गुरव, प्राची तनाजी बाणे, दीपक बाळकृष्ण बाणे, निलेशा झिंजु बाणे, सुनीता रमेश गुरव, सुलोचना वसंत गुरव, मनीषा रमेश गुरव, रेखा रमेश गुरव, सुमती रमेश गुरव आणि स्वप्ना सचिन गुरव यांच्यासह शेकडो युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

अॅड. सिद्धेश माणगांवकर यांच्या प्रवेशामुळे फणसगाव परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून स्थानिक राजकारणात नवे वळण येणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.

You cannot copy content of this page