चाफ्याचे रोप देऊन केला सन्मान..
कुडाळ : नुकत्याच कुडाळ तालुक्यातील विविध ठिकाणच्या सात घरफोड्या, दरोडे ,चोरी करणाऱ्या आरोपीस जेरबंद व बिडवलकर खुन प्रकरणात योग्य तपास करणाऱ्या कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि कुडाळ पोलीस ठाण्यातील त्यांच्या सह कर्मचाऱ्यांचे मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब आणि पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन अभिनंदन केले आहे. याप्रसंगी त्यांना सुगंधी चाफा फुलाचे रोप देऊन पोलिसांना सन्मानित करण्यात आले.
या सात घरफोड्या मधील सर्व मुद्देमाल – दागिने, मौल्यवान ऐवज व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली असून, आरोपीस शिताफिने पकडण्यात आले आहे. अशा चोऱ्या करणाऱ्या व्यक्तीस चोरी पचली तर चोर मोठ्या चोऱ्या व दरोडे घालण्याचे साहस करतात.. त्यांना वेळीच ठेचण्यात कुडाळ पोलिसांना यश मिळाले असल्याने भविष्यातील अनर्थ टळला आहे. असे मनसे कडून सांगण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब सह उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव ,उप तालुकाध्यक्ष गजानन राऊळ ,वाहतूक सेना पदाधिकारी विजय जांभळे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष यतीन माजगावकर, नेरुर शाखाध्यक्ष अनिकेत ठाकूर , महाराष्ट्र सैनिक राज वर्देकर उपस्थित होते.