मळगाव ब्रिजवर ट्रॅव्हलर्स व डंपर मध्ये भीषण अपघात…

सुदैवाने जीवित हानी टळली: ट्रॅव्हलर चे मोठे नुकसान..

⚡सावंतवाडी ता.०९-:
आज सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास झराप- पत्रादेवी हायवे मळगाव जोशी मांजरेकरवाडी येथे मळगाव ब्रिजवर टेम्पो ट्रॅव्हल्स व डंपर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरला झोप आल्याने त्याने मागून डंपरला जोरदार धडक दिली.

हि धडक एवढी मोठी होती की डंपरचची मागील दोन्हीही चाक तुटून रस्त्याच्या बाजूला पडली व टेम्पो ट्रॅव्हल्स जाऊन झाडावर आदळली. या अपघातात गोवा दर्शनासाठी जाणारी गुजरात, सुरत येथील कुटुंब जखमी झाले. त्यामध्ये मयूर मालविया 35, समीक्षा मालविया 32, चंद्रिका मालविया 37, बन्सी मालविया 21, हीत मालविया 10 किरीट मालविया 42, हे किरकोळ जखमी झाले. ड्रायव्हर विजयकुमार झापडी 35 याचे हाता पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्याला गोवा बांबुळी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. याप्रसंगी संजय जोशी, सचिन मांजरेकर यांनी जखमींना मदत करून 108 ला कॉल केला व हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली. सुहास पेडणेकर यांनी अपघातग्रस्तांचे सामान आपल्या रिक्षेमध्ये घालून त्यांना हॉस्पिटलमध्ये सुपूर्द केले. सदर घटनेच्या वेळी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले तेथील ग्रामस्थ संजय जोशी, बाळा आरवंदेकर, सुनील नेमळेकर, दीपक जोशी, सचिन मांजरेकर, प्रणव मांजरेकर, गणेश जोशी, रिक्षा चालक सुहास पेडणेकर तसेच हॉस्पिटलमध्ये तत्काळ रुग्णांना सेवा देणारे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी अपघातग्रस्तांना मदत कार्य केले. गुजरात मालविया परिवाराकडून त्यांचे आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page