⚡सावंतवाडी ता.०१-: न्हावेली गावचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांची शिवसेनेच्या सावंतवाडी उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब आणि तालुका प्रमुख नारायण राणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
या प्रसंगी राज धवण,नवनाथ पार्सेकर,विठ्ठल परब,तुकाराम पार्सेकर, अमोल पार्सेकर यांच्यासह न्हावेली गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पार्सेकर यांचे अभिनंदन केले. नव्या जबाबदारीसाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले असून, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पूर्ण ताकद लावणार असल्याचे सांगितले.
