Headlines

उभादांडा येथील आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद…

वेंगुर्ला प्रतिनिधी – माझा वेंगुर्ला संस्था, प्रा.एस.एन.ओझा फाऊंडेशन आणि मॅनकाईंड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उभादांडा येथील आरोग्यधाम येथे २१ मार्च रोजी आयोजित मोफत हृदयविकार आरोग्य तपासणीचा ५० रूग्णांनी लाभ घेतला.

  या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी माझा वेंगुर्ला संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पुनाळेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजन गावडे, दादा साळगावकर, रमेश नार्वेकर, डॉ. अनंत सामंत, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, मॅनकाईंड कंपनीचे धुरी, आरोग्य सेविका धुरी आदी उपस्थित होते.

फोटोओळी- मोफत हृदयविकार आरोग्य तपासणी शिबिरात संजय पुनाळेकर यांनी मार्गदर्शन केले.

You cannot copy content of this page