सावंतवाडी शहरातील महिलांसाठी शुक्रवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी शहरातील महिलांच्या आरोग्याची मोफत तपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवारी 21 मार्च रोजी* आयोजित करण्यात आले आहे.हे आरोग्य शिबिर मुंबई येथील उद्योजक जयवंत नाईक यांच्या सहकार्यातून होत असून या आरोग्य शिबिरासाठी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने सहभाग* घेतला आहे. तरी या शिबिराच्या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकारणी सदस्य पदाधिकारी आणि सदस्यांनी उपस्थित राहावे,असा आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय, सावंतवाडी तालुका पत्रकार संघ तसेच खासकीलवाडा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या आरोग्य शिबिराचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी दहा वाजता* भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयामध्ये होणार* आहे भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड दिलीप नार्वेकर, सचिव बाळासाहेब बोर्डेकर,संचालक उमाकांत वारंग सामाजिक कार्यकर्त्या
सौ संजना उर्फ मीनल संजू परब, सीमा नाईक तसेच सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी डॉक्टर्स व कर्मचारी वृंद यांनी रहावे ही विनंती आहे

You cannot copy content of this page