गणेश गावकर:उबाठा गट युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांचे देवगड पोलिसांना निवेदन..
⚡देवगड ता.१९-: देवगड तालुक्यातील बऱ्याचशा खेडेगावात व शहरीभागात मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीची दारू व आम्ली पदार्थ विक्री होत असून यावर कोणतीही कारवाई होत नाही यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी देवगड पोलिसांकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,देवगड तालुक्यातील बऱ्याचशा खेडेगावात व शहरीभागात मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीची दारू व आम्ली पदार्थ विक्री होत असल्याचे आम्ही आपल्याला वारंवार सांगितले आहे. परंतु आपण कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई केल्याचे निदर्शनास येत नाही. या गोवा बनावटीच्या दारूमुळे व आम्ली पदार्थाच्या विक्रीमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. व तरुण पिढी या आम्ली पदार्थाच्या व्यसनामुळे बरबाद होत चालली असून आपण यावर तात्काळ कारवाई नाही. या निवेदनाची दखल घेवून लवकरात लवकर कारवाई कराल अशी अपेक्षा आहे.मात्र योग्य ती कारवाई न केल्यास शिवसेना युवासेना देवगड तालुक्याच्या वतीने आपल्या पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी देवगड पोलिसांना निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी शिवसेना पदाधिकारी उदय करंगुटकर, बाळा कनेरकर उपस्थित होते.