राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या माध्यमातून महिलांना देवदर्शन…

कणकवली शहरातील महिला श्री देव मार्लेश्वर येथे देवदर्शनासाठी:कणकवली शहरातील शिवाजीनगर, जळकेवाडी, परबवाडीतील महिलांचा सहभाग..

⚡कणकवली ता.१९-: कणकवली शहरातील शिवाजीनगर, जळकेवाडी, परबवाडी या प्रभागातील महिलांना श्रावणसोमवारनिमित्त गेली दहा ते बारा वर्षे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबिद नाईक यांच्या माध्यमातून देवदर्शनाला पाठविण्यात येते. यावर्षी या भागातील सुमारे ४० महिलांना रत्नागिरी जिल्हयातील श्रीदेव मार्लेश्वर येथे दर्शनासाठी पाठविण्यात आले.

गेल्या दहा ते बारा वर्षे शिवाजीनगर, जळकेवाडी, परबवाडी भागातील महिलाना श्रीदेव कुणकेश्वर येथे दर्शनासाठी पाठविण्याचा उपक्रम श्री. नाईक राबवित आहेत. या भागातील महिलावर्ग आपुलकीने देवदशर्नासाठी सहकार्याची मागणी अबिद नाईक यांच्याकडे करत असतात व श्री. नाईक न चुकता या सर्वांना सहकार्य करतात, याबाबत या महिलांनी त्यांचे आभारही व्यक्त केले आहेत. अबिद नाईक यांच्याकडे राजकारणातून आम्ही कधीही पाहत नाहीत. समाजकरणाच्या माध्यमातून सातत्याने समाजासाठी विविध उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार असतो. याच समाजकरणाच्या भावनेते ते आम्हाला दरवर्षी देवदशर्नासाठी सहकार्य करतात, असेही या महिलांनी सांगितले.

श्रीदेव मार्लेश्वर येथे रवाना झालेल्या या महिलांच्या मिनीबसचा श्रीफळ वाढवून शुभारंभ श्री. नाईक यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी सौ. उज्ज्वल जावडेकर, सौ. दिपाली जावडेकर, सौ. स्वाती पोयेकर, सौ. शुभदा हिंदळेकर यांच्या पुढाकाराने या प्रभागातील महिलांना एकत्रित करून हा उपक्रम राबविण्यात येतो.

You cannot copy content of this page