जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत: मोठ्या उत्साहात सावंतवाडीत वाढदिवस साजरा..
⚡सावंतवाडी ता.१९-: भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब. यांनी नगराध्यक्ष म्हणून उत्तम काम केले आहे आणि पक्ष संघटनेमध्ये त्यांचे काम हे उत्तम आहे .त्याने असे चांगले काम संघटनेमध्ये करत राहावे त्यांचे राजकीय भवितव्य चांगले आहे त्यांच्या मनातील इच्छा परिपूर्ण होईल.असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व आदी उपस्थित सर्व मान्यवरांनी आज येथे दिले.दरम्यान संजू परब यांच आमदार होण्याचे स्वप्न निश्चितच पुरे होईल आम्ही सर्व सहकार्य करू असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी दिल्या.श्री परब यांचा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी संजू मी तुझ्या पाठीशी आहे अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत माझे आमदार राजन तेली जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी व्हाईस चेअरमन अतुल काळसेकर जिल्हा बँक संचालक महेश सारंग अंकुश जाधव गुरुनाथ पेडणेकर चंद्रकांत जाधव रेश्मा सावंत प्रमोद सावंत सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ प्रताप परब प्रल्हाद तावडे शशिकांत मोर जकर अजय गोंदाव ळे बंटी पुरोहित सुहास सावंत गजानन बांदेकर प्रमोद गावडे महेश धुरी उन्नती धुरी. राजू बेग आधी उपस्थित होते यावेळी माजी आमदार राजन तेली. चेअरमन मनीष दळवी अतुल का ळ से कर. महेश सारंग गुरुनाथ पेडणेकर सचिन पालव आधीनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मोठ्या संख्येने संजू परब प्रेमी उपस्थित होते सह्याद्री फाउंडेशन व संजू परब मित्र मंडळ यांच्या वतीने हा कार्यक्रम करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील राऊळ यांनी तर सूत्रसंचालन रुपेश पाटील यांनी केले.