डिंगणे वासीयांनी कडशी नदीवरील काम रोखले

*💫बांदा दि.१८-:* आडाळी येथील एमआयडीसीच्या पाणी व्यवस्थापनासाठी आडाळी येथील कडशी नदीपात्रात केलेल्या खोदकामामुळे डिंगणे व डोंगरपाल या गावांच्या नळपाणी योजना प्रभावित झाल्या असून, नदीपात्रात केलेल्या खोदाईमुळे पात्रातील पाण्याची पातळी सुद्धा घडली आहे. त्यामुळे भविष्यात शेती बागायतीला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने डिंगणे येथील सामाजिक कार्यकर्ते विलास सावंत व ग्रामस्थांनी सदरील काम रोखले. जोपर्यंत उच्चपदस्थ अधिकारी…

Read More

देवगड प्रादेशिक नळयोजना पाणीपट्टी थकित ठेवणाऱ्यांचा पाणी पुरवठा थांबवा

जलव्यवस्थापन सभेत अध्यक्ष म्हापसेकर यांचे आदेश सिंधूदुर्गनगरी ता १८ देवगड विजयदुर्ग प्रादेशिक नळ पाणी योजनेवर कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र या योजनेची पाणी पट्टी आवश्यक त्या प्रमाणात वसूल होत नाही. या योजनेची आतापर्यंत तब्बल ७४ लाख रुपयांची पाणी पट्टी थकीत असल्याची बाब आजच्या सभेत उघड झाली. यावर ज्या ग्रामपंचायत पाणी पट्टी भरत नाहीत…

Read More

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २२ ते २६ मार्च रोजी कुडाळ येथे मार्गदर्शन शिबिर….

स्थानीय लोकाधिकार समिती व आ. वैभव नाईक यांच्या वतीने आयोजन *💫कुडाळ दि.१८-:* सारस्वत बँकेची होऊ घातलेली स्टाफ भरती तसेच बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने परीक्षा पूर्व तयारीसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन शिबीर सोमवार २२ मार्च ते…

Read More

पतसंस्थेसह बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना जामीन मंजूर

*💫सावंतवाडी दि.१८-:* तालुक्यातील एका पतसंस्थेसह एका बँकेची खोटे दागिने देऊन फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या त्या महिलेसह सोनाराला प्रत्येकी १५ हजार रुपयाचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. याकामी संशयितांच्या वतीने अँड. सुहेब डिंगणकर, अँड. सागर ठाकुर, अँड. वैभव चव्हाण, आणि अँड सुप्रीम परब यांनी काम पाहिले आहे.

Read More

वायरी भूतनाथ निशाणकाठी येथे २३ ला धार्मिक कार्यक्रम

*💫मालवण दि.१८-:* वायरी भूतनाथ येथील न्यू उभाटकर निशाणकाठी महापुरुष मित्रमंडळातर्फे २३ मार्चला श्री देव उभाटकर निशाणकाठी महापुरुष येथे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ८ पासून धार्मिक कार्यक्रम, सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ ते ३ महाप्रसाद, ७ वा. सिंधुरत्न संगीत विशारद बुवा भालचंद्र केळुसकर यांचे भजन, रात्री १० वा. दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ यांचे ‘छिन्नमस्ता’ हा ट्रिकसीनयुक्त…

Read More

मनसे तर्फे २० रोजी मालवणातील दैवज्ञ भवन येथे आरोग्य शिबिराचे आयोजन…

मनसे नेते परशुराम उपरकर यांची संकल्पना;सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यावा-सांडव,गिरकर *💫मालवण दि.१८-:* मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून मालवणमधील दैवज्ञ भवन येथे शनिवार दि.२० मार्च रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत या कालावधीत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.अत्याधुनिक संगणकीय ऑटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पद्धतीने होणार्‍या या शिबिरात ईसीजी तपासणी व रीपोर्ट कार्ड साठी नाममात्र १००…

Read More

प्रसंगावेळी आम्ही सर्व एकच

पडते आजारी पडल्यावर सदस्यांनी दाखविली एकीची भावना रणजीत देसाई पहिले गेले मदतीला *💫ओरोस दि.१८-:* राजकारण करण्याला मर्यादा आहे. ते शाब्दिक व विकास प्रक्रियेपुरते मर्यादित असावे, अशी राजकीय व्याख्या आहे. याचा प्रत्यय गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभेत दिसून आले. अभिनंदन ठरावावरुन सभेत भाजपच्या रणजीत देसाई व शिवसेनेच्या संजय पडते यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हा वाद एवढा…

Read More

परजिल्ह्यातील आरटीओ विरोधात राष्ट्रवादी आक्रमक

कारवाई थांबवा:अन्यथा आरटीओ कार्यालयाला घेराव घालण्याचा व्यापरी जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवींचा इशारा सावंतवाडी : परजिल्ह्यातून दोन दिवसांपासून आरटीओची पथके येऊन जिल्ह्यातील मालवाहक वाहनांना, डंपर व्यवसायिकांना नाहक त्रास देत आहेत. त्यांच्यावर कारवाई करत भरमसाठ दंड वसूल केला जातेय. कोरोनामुळे व्यवसायिक आधीच अडचणीत असताना अशा प्रकारे कारवाई करत व्यवसायिकांच्या पोटावर पाय आणला जातोय. गाड्यांचे हाप्ते देखील थकित असल्यानं…

Read More

सरकारने मत्स्य व्यवसाय कायदे सुधारून व्याख्या स्पष्ट करावी

सिंधुदुर्ग जिल्हा पर्सनेट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक सारंग *💫मालवण दि.१८-:* मासेमारी व्यवसायाशी संबंधित कायद्यात असलेल्या त्रुटी, राज्य व केंद्र शासनाच्या मासेमारी कायद्यातील तफावत आणि कायद्यांची योग्यप्रकारे न झालेली अंमलबजावणी यामुळेच आज पारंपारिक मच्छीमार व पर्ससीन धारक मच्छीमार या दोन भावांमध्ये वाद निर्माण होत आहेत. अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या परिभाषेला दोन अर्थ लागत असल्याने भांडणे होत आहेत. या…

Read More

कणकवली न.प निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करतोय

नारायण राणेंच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नलावडे व त्यांची टीम मेहनत घेतेय रिंगरोड लोकार्पण प्रसंगी आ राणे यांची प्रतिक्रिया *💫कणकवली दि.१८-:* माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली शहराचा नियोजनबद्ध विकास करण्याचा नगरपंचायत निवडणुकीत शहरवासीयांना दिलेला शब्द पूर्ण करतोय. शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांची टीम मेहनत घेत असल्याचे आमदार नितेश राणे यांनी रिंगरोड च्या…

Read More
You cannot copy content of this page