जिल्हा नियोजन सभा शांततेत संपन्न…

कोणतेही राजकीय आरोप प्रत्यारोप सभेत न होता मात्र प्रशासनावर सर्वपक्षीय बरसले.. ⚡ओरोस ता.१६-: खा नारायण राणे, आ नितेश राणे यांच्या अनुपस्थितीत मंगळवारी पार पडलेली जिल्हा नियोजन सभा शांततेत पार पडली. कोणतेही राजकीय आरोप प्रत्यारोप न झालेल्या या सभेत प्रशासनावर मात्र सर्वपक्षीय बरसले. जिल्हा परिषद, बांधकाम, शिक्षण, एस टी, ग्रामसडक योजना, वीज वितरण हे विभाग सभागृहात…

Read More

डिग्री इंजिनिअरिंग केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरु…

सावंतवाडी – शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता पदवी अभियांत्रिकीची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया शासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 27 जुलैपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरू शकतात. यासाठी शासनाने जिल्हानिहाय स्क्रुटीनी सेंटर्स सुरू केली असून यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे शासनाचे अधिकृत प्रवेश सुविधा केंद्र (एससी ३४७०)…

Read More

कार्यकारी अभियंत्यांकडे कणकवलीचा की मुंबईचा कारभार…

पालकमंत्री आता तरी बोलतील का? माजी आम.परशुराम उपरकर यांचा सवाल.. ⚡कणकवली ता.१६-: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली येथील कार्यकारी अभियंत्यांकडे नेमका कोणता कार्यभार आहे? मुंबईचा कार्यभार असल्याप्रमाणे कार्यकारी अभियंता हे मुंबईला ठाण मांडून असतात त्यामुळे पालकमंत्र्यांनी त्यांच्यावर नेमकी कोणती जबाबदारी दिली आहे याचा खुलासा करावा. सिंधुदुर्गात अतिवृष्टी काळात लोक हैराण झाले असताना कार्यकारी अभियंता मात्र मुंबईवारी…

Read More

विद्यार्थ्यांचा गौरव हा त्यांच्या परिश्रमाचे कौतुक-अॅड.गोडकर…

⚡वेंगुर्ला ता.१६-: भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा होणारा गौरव हा त्यांनी घेतलेल्या परीश्रमाचे कौतुक आहे. आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी यापुढील शिक्षणांत यापेक्षाही परीश्रम घेत यश प्राप्त करावे. आपले व आपल्या समाजाचे नाव तालुक्यात जिल्ह्यात रोशन करावे यासाठी दिलेले प्रोत्साहन आहे. भविष्यात मोठमोठ्या हुद्द्यावर काम करावे किवा स्वतंत्र व्यावसाय करून इतरांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. त्याचा समाजातील…

Read More

सावंतवाडी रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी धावली रेल्वे प्रवासी संघटना…

⚡सावंतवाडी ता.१६-: नातुवाडी (खेड) बोगद्याजवळ दरड कोसळल्याने पूर्ण कोकण रेल्वे ठप्प झाली. विविध रेल्वे गाड्या ह्या विविध स्थानकावर थांबवण्यात आल्या.१२२०२ गरीब रथ एक्स्प्रेस ही सावंतवाडी स्थानकात थांबवली होती. त्या गाडी ने प्रवास करणारे प्रवासी (एकूण प्रवासी ७०० पेक्षा अधिक) हे स्थानकावर असलेल्या अपुऱ्या खान -पानाच्या सुविधेमुळे त्रस्त झालेले होते, ट्रेन मधले पाणी देखील संपले होते,…

Read More

गणेशोत्सवात भजन मंडळांना तबला पेटी देणार…

दीपक केसरकर ; कार्यालयाशी संपर्क साधा.. सावंतवाडी : गणेशोत्सव जवळ येत असून भजन मंडळांना तबला, पेटी, टाळ-मृदंग माझ्या माध्यमातून देणार आहे. गणरायाची सेवा म्हणून आपण हे करतो. त्याबाबतचा सर्वे देखील केला जाणार असून भजन मंडळांच्या संस्थेनं कार्यालयाशी संपर्क साधावा अस आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. तसेच गणेश मुर्तीकारांसाठी देखील सिंधुरत्न मधून एखादी योजना…

Read More

केसरी ग्रामविकासाचे पर्यटन-मॉडेल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या व्हिजनरी दृष्टीचे प्रतिक…

विशाल परब:केसरीत जागतिक दर्जाचा पर्यटन प्रकल्प राबवत जिल्ह्याच्या विकासाला त्यांनी दिलेली दिशा राज्याला आदर्शवत… ⚡सावंतवाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरी हे गाव अवघ्या काही कालावधीतच जगभरात पर्यटनाचा आकर्षण बिंदू म्हणून नावारूपाला आले आहे. येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ॲक्वेरियनला आज देशोदेशीचे पर्यटक भेट देत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचे व्हिजनरी कार्य कसे असते, ते यामधून दिसून…

Read More

स्थानिकांच्या विरोधात जाऊन कोणतेही प्रकल्प, विकास करण्यात अर्थ नाही…

मंत्री दिपक केसरकर:राजकीय पोळी भाजून घेण्याची विनायक राऊत व सहकाऱ्यांची पूर्वीपासूनची सवय.. ⚡सावंतवाडी ता.१६-: स्थानिक लोकांचा पाठिंबा असेल तरच मायनिंगसारखे प्रकल्प राबवायचे असतात. स्थानिकांच्या विरोधात जाऊन कोणतेही प्रकल्प, विकास करण्यात अर्थ नाही. आजगावला आमच्या जमिनी या पुर्वीपासून आहे. या जमिनींवर कुठलाही मायनिंग प्रोजेक्ट नाही. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं, नाहक बदनामी करायची ही माजी खासदार…

Read More

जलजीवनच्या अपूर्ण कामांबद्दल भाजप ठेकेदारांचीही तक्रार करा…

सतीश सावंत यांचे आ. राणे यांना आव्हान:दहा दिवसांत सर्वच कामांचा पंचनामा करणार… कणकवली : शिवसेनेचे काम करत असलेले रामदास विखाळे यांना टार्गेट करून ते आपल्या पक्षात कसे येतील यासाठी आ. नितेश राणे दबावतंत्र वापरत आहेत. विखाळेंची कामे अपूर्ण असतील तर त्यांची तक्रार जरूर करा, परंतु आ. नितेश राणे यांनी गांधीनगर, कलमठ, वरवडे, हरकुळखुर्द, नाटळ या…

Read More

न्हावेली येथील प्रमुख मानकरी चंद्रकांत नाईक यांचे दुःखद निधन…

⚡सावंतवाडी ता.१६-: न्हावेली येथील चंद्रकांत तुकाराम नाईक (वय ७२) यांचे सोमवारी अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले. ते न्हावेली देवस्थानचे प्रमुख मानकरी होते.पश्चिम महाराष्ट्र स्थानीक सल्लागार देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष तथा न्हावेली तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंद नाईक यांचे ते वडील होत,त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली,भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Read More
You cannot copy content of this page