⚡मालवण ता.२२-: वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे आज शनिवारी सकाळी आचरा भंडारवाडी येथील प्रभाकर यशवंत आचरेकर यांच्या घरावर माडाचे झाड पडून पडवीसह घराच्या छपराचे सुमारे ७० हजाराचे नुकसान झाले आहे . या वादळी वाऱ्याचा फटका विज वितरण कंपनीलाही बसला असून विद्यूत पोल मोडून पडल्याची घटना भंडारवाडी येथे घडली आहे.
आचरा परीसरात शनिवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी राजा सुखावला आहे. त्यामुळे रखडलेली लावणीची कामे आता वेग घेणार आहेत. शनिवारी सकाळी आकस्मित आलेल्या सोसाट्याच्या वारयाने भंडारवाडी येथील प्रभाकर आचरेकर यांच्या घरावर माडाचे झाड पडले. सुदैवाने घराला पोटमाळा असल्याने घरातील माणसे बचावली
या घटनेची खबर मिळताच आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस , उप सरपंच संतोष मिराशी, माजी सरपंच राजन गावकर, योगेश बागवे, आचरे पोलीस पाटील विठ्ठल धुरी यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
