घाडीगांवकर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी कणकवली मध्ये होणार गुणगौरव…

⚡मालवण ता.२२-: क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई , विभागाच्यावतीने रविवार दि. २३ जून २०२४ रोजी कणकवली येथे इयत्ता १० वी आणि १२ वी यंदा उत्तीर्ण झालेल्या घाडीगांवकर समाजातील गुणवंत विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी परीक्षेत ७५% पेक्षा अधिक आणि इयत्ता १२ वी परीक्षेत ६० % पेक्षा अधिक गुण मिळाले असतील , त्यांनी आपली नावे समाजाच्या व्हाट्सअप ग्रुपवर पाठवावीत. तसेच ५ वी व ८ वी स्कॉलरशिप प्राप्त यादीतील विद्यार्थी, नवोदय निवड यादीतील विद्यार्थी, इंजिनिअरिंग, मेडिकल, बी. फार्मसी पास विद्यार्थ्यांनी आपले डिटेल्स व्हाट्सअप ग्रुपवर पाठवावे.

कार्यक्रमाला येताना मार्कलिस्टची झेरॉक्स कॉपी घेऊन येणे. कार्यक्रमाचे ठिकाण मातोश्री मंगल कार्यालय, मुंबई -गोवा हायवे, नवरे हॉस्पिटल समोर, कणकवली असे असून सकाळी ठीक – १०.०० वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल याची नोंद घ्यावी . सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईवरून अध्यक्ष – मुंबई महाराष्ट्र राज्य घनश्यामजी गांवकर हे उपस्थित राहणार आहेत .अधिक माहितीसाठी सूर्यकांत घाडी- 9422967374, प्रदीप घाडी – 9757174528, . पत्रकार विजय गांवकर – 9422434532, बुधाजी घाडीगांवकर – 9420216562 यांच्याशी संपर्क साधावा असे असे आवाहन क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

You cannot copy content of this page