भारत टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर…

वेदांत संदीप सावंत जिल्ह्यात प्रथम तर नील बांदेकर द्वितीय;विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव…

⚡बांदा ता.२२-: भारत टॅलेंट सर्च या स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये केंद्र शाळा बांदा नंबर एकचा इयत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थी नील नितीन बांदेकर हा संपूर्ण जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त करत राज्यस्तरावर टॉप टेन मध्ये सिलेक्ट झाला आहे. तसेच खेमराज मेमोरियल स्कूल बांदाचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी वेदांत संदीप सावंत याने जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. आणि राज्यात गुणवत्ता यादीमध्ये तेराव्या स्थानी झळकला आहे.

यासाठी वेदांत आणि नील यांना शिक्षिका सौ. शुभेच्छा सावंत यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले आहे. विविध स्तरातून नील आणि वेदांतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page