सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी संस्थेच्या वतीने १ जुलै रोजी “वर्षा कृषी पर्यटन सहलीच आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२२-:
सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी संस्थेच्या वतीने येत्या दि .१ जुलै रोजी “वर्षा कृषी पर्यटन सहल “आयोजित करण्यात आली आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील असे अध्यक्ष रामानंद शिरोडकर यांनी म्हटले आहे.
कृषी पर्यटन सहलीमध्ये बँकेचे संचालक, सभासद, संस्थेचे सभासद, कृषी पर्यटन व्यावसायिक सहभागी होतील असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले,सावंतवाडी पासून ही सहल सुरू होईल. सावंतवाडी ते माडखोल सावंत फार्म, दाणोली साटम महाराज मंदिर, कृषी पर्यटन केंद्र, केसरी मत्स्यालय प्रकल्प, आंबोली धबधबा, आंबोलीतील विविध पॉईंट, कुंभवडे बाबा धबधबा,विजय गावडे कृषी पर्यटन केंद्र, पारगड किल्ला दर्शन करून तळकट मार्गाने परत ही सहल परतीच्या मार्गावर समाप्त होईल.
कृषी पर्यटन व्यावसायिक, कृषी पर्यटकांनी या सहलीत सहभागी व्हायचे असेल तर संचालिका सौ.विभावरी सुकी (मोबाईल नंबर 8275775972 ) यांच्याशी संपर्क येत्या दि .२८ जून पर्यंत साधावा असे आवाहन रामानंद शिरोडकर यांनी केले आहे .या सहलीत प्रति व्यक्तीला एक हजार रुपये खर्च अपेक्षित आहे असे त्यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page