जिल्ह्यात जोरदार चर्चा: मात्र निकटवर्तीयांकडून मौन..
⚡सावंतवाडी ता.२१-: आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राजन तेलींच्या नावाची जिल्ह्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या आगामी निवडणुकीत विधानपरिषद माजी आमदार असणाऱ्या राजन तेलींना पुन्हा विधान परिषदेवर संधी मिळणार का ? हे पण आता महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे त्यांच्या निकटवर्तीयांकडून देखील अद्याप कोणताही दुजोरा दिला जात नाही.
परंतु, सध्या राजन तेली यांच्या विधानपरिषदेवर जाण्याच्या चर्चांना सध्या जिल्ह्यात जोर धरू लागला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व राजन तेली यांच्या उमेदवारीवरून येणाऱ्या विधानसभेत महायुतीत तेढ निर्माण होऊ नये म्हणून तेलींना विधानपरिषद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
