आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी भाजप कडून उद्या विविध कार्यक्रम…

सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उद्या सकाळी 10 वा. शाळा नंबर 4 येथे उपस्थित राहावे.; संजू परब यांचे आवाहन..

⚡सावंतवाडी ता.२१-: भाजप युवा नेते तथा आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात भाजपच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उद्या सकाळी 10 वाजता चार नंबर शाळेचे उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले आहे.

दरम्यान आमदार राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहरातील चार नंबर शाळा येथे
मुलांना वह्या वाटप नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना डेटॉल हॅन्ड वॉश वाटप तसेच एसपीके कॉलेजमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप असे विविध उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच राणें यांचा वाढदिवस हा रविवारी असून मात्र कॉलेजला सुट्टी असल्याने हा वाढदिवस उद्या विविध उपक्रमाने साजरा करण्यात येणार असल्याचा देखील श्री परब यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page