Headlines

ऋतुजा नाईक हीचा रोणापाल मध्ये सत्कार…

⚡बांदा ता.२१-: रोणापाल येथील ऋतुजा नाईक हीने कोणताही अतिरिक्त क्लास न करता दहावीच्या परीक्षेत ९५.६० टक्के गुण मिळवून मडूरा हायस्कूलमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. तिच्या या यशाबद्दल रोणापाल येथील श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गावडे यांच्या हस्ते ऋतुजा हिला शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

      ऋतुजा नाईक ही शेतकरी कुटुंबातील असून शेतीसह अन्य घरगुती कानात आईवडिलांना मदत करून तीने यश संपादन केले. अन्य कोणताही क्लास न करता नियमित अभ्यासाच्या जोरावर तीने ९५.६० टक्के गुण मिळविले. कॉम्प्युटर इंजिनीअरिंग क्षेत्रात करियर करण्याचा मानस तीने व्यक्त केला.

     ऋतुजाने मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. तीने भविष्यात यश मिळवून आईवडिलांचे व गावाचे नाव उज्वल करावे. तीला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रकाश गावडे यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे बाबल तुयेकर, मंगेश गावडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page