बाबा काणेकर यांचा पुढाकार: ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त..
⚡बांदा ता.२१-: येथील अनेक अपघातांना कारणीभूत ठरणारा गटार आज बंदिस्त करण्यात आला. गेले अनेक महिने येथील नागरिक ग्रामपंचायत तसेच वार्ड सदस्याला याबाबत कल्पना देत होते. तसेच याबाबत अनेक तक्रारी देखील केल्या होत्या. परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नाही. शहरातील मुख्य रस्त्यावर,जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असल्याने मुलांच्या जीविताला धोका होता.या गटारात वारंवार अपघात घडत होते. कालच एक शाळकरी मुलगी अपघातग्रस्त झाली. याची कल्पना ग्रामस्थ संदेश सातार्डेकर यांनी बांदा भाजपा शहर अध्यक्ष नरसिंह उर्फ बाबा काणेकर यांना दिली. त्यांनी याची लगेच दखल घेत, स्वखर्चाने हा गटार बंदिस्त करून घेतला.त्यामुळे स्थानिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी बाबा काणेकर, गुरु कल्याणकर, अण्णा आळवे, संदेश सातार्डेकर उपस्थित होते
