सौ स्नेहा कासकर: माजगाव ग्रामपंचायत मध्ये योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.
⚡सावंतवाडी ता.२१:- चांगले आरोग्य जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने योगाकडे वळले पाहिजे, योगामुळे नैराश्य चिंता व तणाव कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते असे प्रतिपादन योगा प्रशिक्षक सौ स्नेहा कासकर यांनी आज येथे केले.येथील माजगाव ग्रामपंचायत मध्ये योगा दिनानिमित्त त्या उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
यावेळी सरपंच सौ अर्चना सावंत व ग्रामपंचायत सदस्य श्री संजय कांसे ग्रामपंचायत कर्मचारी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात योगा दिन साजरा करण्यात आला.
