दांडी शाळेत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न…

⚡मालवण ता.२१-: मालवण दांडी येथील जि प प्राथमिक शाळेतील सर्व ४४ विद्यार्थ्यांना
कै.सौ.वर्षा विश्वास मोंडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री.विश्वास नारायण मोंडकर यांच्या कडून मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.

यावेळी व्यासपिठावर दाते श्री.विश्वास नारायण मोंडकर, श्री.सचिन मालंडकर, श्री.रुपेश धुरी, सौ.कुबल, सौ.मनीषा ठाकुर, सौ.अमृता राणे, मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण, राज्यपुरस्कार प्राप्त पदविधर शिक्षक तथा मालवण केंद्रप्रमुख श्री.शिवराज सावंत उपस्थित होते. विश्वास मोंडकर व मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज सावंत यांनी केले, तर आभार सौ.मनिषा ठाकुर यांनी मानले.

You cannot copy content of this page