कोकण पदवीधर इंडिया आघाडीचे उमेदवार रमेश कीर आज सावंतवाडीत…

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत: शहरातील शैक्षणिक संस्थांना भेट देत केली चर्चा..

⚡सावंतवाडी ता.२१-: कोकण पदवीधर मतदार संघाचे इंडिया आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर आज सावंतवाडी तालुका दौऱ्यावर आले असताना त्यांनी माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर यांच्या निवासस्थानाला भेट दिली. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.दरम्यान सावंतवाडी शहरातील महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांना श्री किर यांनी भेट देत विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी ॲड. दिलीप नार्वेकर , इर्शाद शेख सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ,महेंद्र सांगेलकर तालुकाध्यक्ष सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटी , ॲड. राघवेंद्र दिलीप नार्वेकर शहराध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी, कु. जास्मिन लक्ष्मेश्वर सिंधुदुर्ग युवक काँग्रेस उपाध्यक्ष , बासित पडवेकर युवक काँग्रेस शहराध्यक्ष , प्रांतिक सदस्य विभावरी सुखी , माजी तालुकाध्यक्ष बाब्या म्हापसेकर , आनंद परूळेकर, संदीप सूखी, बाळासाहेब बोर्डेकर, नंदीहळी सर , चंद्रकांत राणे, ओसवाल डिसोझा, इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page