वीज पडून इन्सुलेटर फुटल्याने देवगडचा वीजपुरवठा तब्बल सात तास बंद…

सात तासाने विद्युत पुरवठा सुरळीत कर्मचाऱ्यांना आले यश..

⚡देवगड ता.२०-: देवगड तालुक्यात उसंत घेतलेल्या पावसाने गुरुवारी पुन्हा दमदार पुनरागमन केले असून विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटा सह पडलेल्या पावसाने देवगडमधील विद्युत पुरवठा दुपारी दीड वाजल्यापासून बंद होता.


अधून मधून हलक्या सरीच्या स्वरूपाने पडलेला पाऊस व वाढलेला उकाडा यामुळे सर्वजण त्रस्त झाले होते. मात्र गुरुवारपासून पावसाने ढगांच्या गडगडाटासह व विजांच्या कडकडाटासह दमदार हजेरी लावली. वीज पडल्याने तळेबाजार येथून वीज पुरवठा दुपारी दीड वाजल्यापासून संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत खंडित झाला होता. वीज पडल्याने विद्युत वाहिनीच्या पोलावरील इंसुलेटर फुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज पुरवठ्यामध्ये असलेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी संपूर्ण वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दुपारपासून लाईनवर तैनात होते. तब्बल सहा तासांनी वीस पुरवठा सुरू करण्यात विद्युत कर्मचाऱ्यांना यश आले.

You cannot copy content of this page