सामाजिक भाव जपण्यासाठी जेष्ठांचा सन्मान – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक..
⚡देवगड ता.२०-: युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या माध्यमातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद गटनुसार जेष्ठ शिवसैनिकांचा कृतज्ञता पुरस्कार -सन्मान पंढरवडा कार्यक्रम ठीक ठिकाणी संपन्न होत आहेत. पडेल जिल्हा परिषद येथे वाडा गावामध्ये जेष्ठ शिवसैनिकांचा कृतज्ञता पुरस्काराचा कार्यक्रम गुरुवारी २० जून रोजी संपन्न झाला. सामाजिक भाव जपण्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून या कार्यकमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील शिवसैनिकांनी त्यावेळी बाळासाहेबांना साथ देऊन कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला केला त्याचे कृतज्ञता म्हणून आम्ही त्या जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करत आहोत.
युवासेनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा परिषद गटात या कार्यक्रमांचे आयोजन युवासेने मार्फत करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार असा ठाम विश्वास युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पडेल येथील मेळाव्यात व्यक्त केला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर, उपजिल्हाप्रमुख यदू ठाकूर देसाई,वाडा सरपंच सुनील जाधव,विभाग प्रमुख रामा राणे, शशांक तावडे, सुहास वाडेकर , संजय तावडे, चंद्रकांत तानवडे, बाबू तानवडे, अजिंक्य तानवडे, राजा परब आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
