वैभववाडी तालुक्यात दुपारपासून पावसाचा जोर…

नगरपंचायतीच्या हद्दीत कोंडवाडी येथे झाड रस्त्यावर पडून दोन तास वाहतूक ठप्प..

⚡वैभववाडी ता.२०-: वैभववाडी तालुक्यात गुरुवारी दुपारपासून पावसाने जोर धरला असून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे वैभववाडी नावळे रस्त्यावर वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या हद्दीत कोंडवाडी येथे आकाशीचे झाड रस्त्यावर पडून दोन तास वाहतूक ठप्पे झाली होती. दोन्ही बाजूला वाहानाचच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. या घटनेची माहिती वाभवे वैभववाडी नगरपंचायत व आपत्ती व्यवस्थापन देऊन सुद्धा नगरपंचायत व आपत्ती व्यवस्थापन चे कोणीही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाली नाही अखेर दोन तासाच्या कालावधीनंतर ग्रामस्थांनी झाड तोडून बाजूला केले व वाहतूक सुरळीत करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहानाच्या लांबचे लांब रांगा लागले होते. त्यामध्ये नावळे वैभववाडी एसटी व वैभववाडी सडुरे शिराळे एसटी बस अडकून पडल्याने शाळकरी मुलांसह प्रवासेचे मोठे हाल झाले. यावेळी निम अरुळे सरपंच सज्जन माईंडकर, पप्प्या रावराणे, प्रकाश कोकरे, अक्षय पाटील, सोड रे ग्रामपंचायत सदस्य जंगम, महेश रावराणे, योगेश सुतार, आधी ग्रामस्थ व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैभववाडी शहरात ठीक ठिकाणी पाणी साचल्याने वाहन चालकासह नागरिकांना मोठा त्रास होत आहे.
तर वैभववाडी नावळे रोडवर वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक 12 मध्ये रस्त्यच्या कडेला गटार नसल्याने पाणी रस्त्यावर तुंबल्याने पूर्ण रस्ता नदीमय झाला होता. त्यामुळे वाहन चालकासह नागरिकांना चा सण करत या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. हीच काय वाभवे वैभववाडी नगरपंचायतीची विकास कामे असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

You cannot copy content of this page