Headlines

ओबीसी महासंघ घेणार उद्या आरक्षित समाज बांधवांवर झालेल्या अन्यायाबाबत जिल्हाधिकारी यांची भेट…

⚡कुडाळ ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ,सिंधुदुर्ग या संस्थेची तातडीची सभा गुरुवारी 20.06.2024.रोजी कुडाळ राजा हॉटेल शेजारी सुनील भोगटे यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाली.या बैठकीत आरक्षित समाजाच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातिल वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधी उपस्तीत होते.त्यामध्ये या बैठकीत प्रामुख्याने आरक्षित समाज बांधवांवर अन्याय झालेल्या लक्ष्मण हाके ,नवनाथ वाघमारे, मंगेश ससाणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला,बैठकीत झालेल्या चर्चे नंतर,सिंधुदुर्ग जिल्हा आरक्षित समाज उद्या.शुक्रवारी 21.06.2024.रोजी दुपारी 3 वाजता लक्ष्मण हाके ,नवनाथ वाघमारे ,मंगेश ससाणे यांच्या संदर्भात आणि 52℅ आरक्षीत समाज यांच्या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहे तेव्हा सर्व आरक्षित समाजाचे जिल्हाध्यक्ष ,आरक्षित समाज बांधव यांनी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.त्यानंतर आरक्षित समाजाची पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या ओरोस येथे बैठक होणार आहे.

यावेळी बैठकीला श्री.नितीन वाळके,ॲड. श्री.नंदन वेंगुर्लेकर,श्री.हेमंत उर्फ काका कुडाळकर,श्री.सुनील भोगटे ,श्री.रमण वायंगणकर ,श्री.गणेश बोर्डेकर ,श्री.भरत आवळे ,श्री.समील जळवी ,श्री.साईनाथ आंबेरकर ,श्री.महेश परुळेकर ,श्री.गुरुदास तेली, डॉ. श्री.वंदन वेंगुर्लेकर,श्री.राजू भोगटे उपस्थित होते.

You cannot copy content of this page