⚡देवगड ता.२३-: जागतिक जलदिना निमित्त पाणी गुणवत्तेत चांगली कामगिरी केल्याबद्दल कातवण जलसुरक्षक विक्रांत जोईल याचे पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर यांनी शाल व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला .
पाणी शुद्धीकरण करणे व पाणी गुणवत्ता चांगली राखण्याची महत्वाची जबाबदारी जलसुरक्षक गावामध्ये पार पाडत असतो . याच अनुषंगाने जागतिक जल दिनानिमित्त दरवर्षी पाणी गुणवत्तेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जलसुरक्षक यांचा सत्कार पंचायत समिती देवगड अंतर्गत करण्यात येतो . यंदाचा उत्कृष्ट जलसुरक्षक म्हणून कातवण मध्ये जलसुरक्षकाचे काम करणारा विक्रांत एकनाथ जोईल याची निवड करण्यात आली आहे .
या सत्कार प्रसंगी डाटा ऑपरेटर मोहीनी खडपकर , व मान्यवर उपस्थित होते .
जागतिक जलदिना निमित्त जलसुरक्षक विक्रांत जोईल यांचा सत्कार…
