वाहतूक पोलिसांनी हरवलेल्या अपंग मुलाला केले आईच्या स्वाधीन…

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी शहरातील परप्रांतीय महिला आपल्या अपंग मुलासहित तेथील एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेली होती. त्यादरम्यान त्यांनी आपल्या मुलाला एटीएम बाहेर ठेवले होते. पैसे काढून त्या बाहेर आल्या असता मुलगा तिथे दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी तेथील परिसरात शोधाशोध केली परंतु मुलगा मिळून आला नाही. शोधा शोधा करत असताना त्यांना वाहतूक पोलीस निदर्शनास आले.

तात्काळ त्यांनी याबाबतची माहिती वाहतूक पोलीस रामचंद्र साटेलकर बाळा साटेलकर, महेश चितारी,बाबू बांदेकर, यांना दिली. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी शहरात सर्वत्र त्या मुलाचा शोध घेऊन त्याला सुखरूप आईच्या ताब्यात दिले. वाहतूक पोलिसांच्या या कार्य तत्परतेबद्दल सावंतवाडी शहरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page