जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आपच्या जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल…

⚡कणकवली ता.२२-: आपचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आप चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्यासह ८ ते १० जणांच्या जमावाने शुक्रवारी दुपारी १ वा. च्या सुमारास कणकवली बुद्ध विहार येथे घोषणा देत निषेध केला.

जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तसेच आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्यासह आदित्य बटवाले, मंगेश दळवी, मिलि मिश्रा ( कुडाळ,) प्रमोद जाधव तरंदळे, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर (कणकवली) शरद खरात (कुडाळ) यांच्यासह ८ ते १० जणांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन सर्व राजकीय पक्षांनी करावे. जिल्ह्यात १४४ कलम लागू असून जमावबंदीचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन कणकवली पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

You cannot copy content of this page