वडाचापाट येथील शांतादुर्गा हायस्कुलमध्ये वन दिवस साजरा…

⚡मालवण ता.२२-: वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल या प्रशालेत हरित सेना अंतर्गत ‘जागतिक वन दिवस’ उत्साहात साजरा झाला. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ‘झाड आहे मानवाचा मित्र उगारू नका त्यावर शस्त्र’, ‘Save Tree, Save Earth’ अशा घोषणा देत पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांनी वृक्ष संवर्धन आणि वृक्षतोड थांबवण्यासाठी रयतेस काढलेल्या आज्ञापत्राचे वाचन करण्यात आले.

पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. दरवर्षी आपल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक झाड लावले तरीसुद्धा पर्यावरणाच्या संवर्धनामध्ये आपण खारीचा वाटा उचलू शकतो आणि सध्याच्या जागतिक तापमान वाढीच्या प्रश्नावर उपाययोजना करू शकतो, असे यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रसाद कुबल यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना सांगितले. या कार्यक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे मालवणचे वनक्षेत्रपाल श्री. जगदाळे, वनपाल श्री. शिदे, वनपाल श्री. लटके यांचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षिका कु. प्रतिभा केळुसकर यांनी केले. तर आभार प्रशालेतील विद्यार्थी कु. श्रेयश ढवळे याने मानले. यावेळी महेश गावडे, कु. हर्षदा पाटकर, सौ. कविता पाटकर, जगन्नाथ आंगणे, संकेत हडकर तसेच विद्यार्थी, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page