विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या परजिल्ह्यातील वाहनांना रोखा…

मनसेच्या सचिन तावडे यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी..

सिंधुदुर्गनगरी ता २१
सिंधुदुर्ग जिल्ह्यात परराज्यातील अवजड वाहने विनापरवाना विविध व्यवसाय करीत आहेत .तरी जिल्ह्यात बेकायदेशीरपणे फिरत असलेल्या वाहनांवर कारवाई करावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव सचिन तावडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा सचिव सचिन तावडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परराज्यातून मोठ्या प्रमाणात डंपर ,जेसीबी, ट्रॅक्टर ,बोरवेल मशीन, पाणी टँकर व इंधन वाहतूक व्यवसाय करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. ही वाहने आपल्या महाराट्र राज्यात काम करताना कोणतेही परमिट घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बूडत आहे. परराज्यातून येणारे डंपर, ट्रॅक्टर यांच्यावर योग्य ती नंबर प्लेट नसते, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला नंबर प्लेट नसतात, वाहन चालक कमी वयाचे व त्यांच्याकडे लायसन तसेच इन्शुरन्स, पीयूसी यासारख्या आवश्यक कागदपत्रे नसल्याचे दिसून येते. तसेच पाणी वाहतूक, इंधन वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे टँकरचे फिटनेस सर्टिफिकेट ,पासिंग झाल्याचे दिसून येत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्त्याची, धरणांची व इतर बांधकामे सुरू आहेत. अशा ठिकाणी या वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. तरी जिल्ह्यात बेकायदेशीरपणे फिरत असलेल्या वाहनांवर योग्य ती कारवाई करावी व शासनाचा महसूल बुडवून अवैध रीतीने सुरू असणाऱ्या व्यवसायावर लगाम घालावा .अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव, सचिन तावडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप जिल्हाध्यक्ष चंदन मेंस्त्री, महेश कदम , योगेश कदम, परेश आडकर, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page