रुग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये…

रुपेश पावसकर;आपण सर्वतोपरी सहकार्य करणार ;शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता..

⚡कुडाळ ता.२४-: शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता श्री.मनोज जोशी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे जिल्ह्यात स्वागत करण्यात आले.

यावेळी अधिष्ठाता यांनी मेडिकल कॉलेज मधील समस्या श्री.रुपेश पावसकर यांना सांगितल्या त्यांचे निवारण आपण मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे माध्यमातून पूर्ण करू असे आश्वासन श्री.रुपेश पावसकर यांनी दिले.यावेळी उपस्थित युवानेतृत्व श्री.शुभम नेरूरकर,मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष प्रतिनिधी श्री.संतोष परब उपस्थित यावेळी अधिष्ठाता श्री.जोशी यांनी आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन प्रमुख म्हणून योग्य ते सहकार्य करू असे आश्वासन दिले तसेच त्यांनी यावेळी बोलताना असे देखील सांगितले की शासन आणि प्रशासन यांनी एकविचाराने काम केल्यास कोणत्याही प्रकारे अडचण होणार असे त्यांनी सांगितले.तसेच आपण आमच्या अजून काही मागण्या आहेत त्यादेखील मुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत पोहोचवा असे सांगितले. .

You cannot copy content of this page