अवैध मायनिंगवर खनिकर्म विभागाने कारवाई करावी…

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर : जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे केली मागणी…

⚡ओरोस ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन तसेच बेकायदा मायनिंग सुरू आहे. या सर्व अवैध धंद्यावर जिल्हा खनिकर्म कार्यालयाकडून तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी विजय साळवे यांच्याकडे केली.रुपेश पावसकर यांनी आज जिल्हा खनिकर्म अधिकारी साळवे यांची ओरोस येथे भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रतिनिधी संतोष परब उपस्थित होते.जिल्हा खनिकर्म अधिकारी साळवे यांनी पावसकर यांच्या तक्रारीची दखल घेत अवैध मायनिंग ला पाठीशी घालणार नसल्याचे सांगत कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page