जिल्हा विकासासाठी प्रशासनाने सकारात्मक असावे…

रुपेश पावसकर:जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन नेहमीच शासनासोबत – जिल्हाधिकारी तावडे..

⚡ओरोस ता.२३-: शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संघटक श्री. रुपेश पावसकर यांनी आज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेत जिल्ह्यातील विकासकामांबाबत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष प्रतिनिधी श्री. संतोष परब उपस्थित होते.चर्चे दरम्यान जिल्ह्याच्या विकासकामांमध्ये प्रशासनाची सकारात्मक भूमिका गरजेची असून त्यातूनच प्रलंबित विकासकामे मार्गी लागतील असे पावसकर यांनी सुचविले.

तर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून आपण कायमच जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. शासन आणि प्रशासन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिल्ह्याचा प्रलंबित विकास साधण्यासाठी निश्चितच सकारात्मक राहूनच प्रस्ताव शासनदरबारी पाठवत आहोत असेही तावडे म्हणाले.

You cannot copy content of this page