आंबोलीत ‘श्रीराम’ उत्सव मोठ्या उत्साहात…

आंबोली,ता.२२:अयोध्येतील श्री राम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आंबोली येथील दोन्ही राम मंदिरात रामाचा उत्सव साजरा करण्यात आला.माऊली मंदिरात ही राम प्रतिमेचा प्रतिष्ठापन सोहळा साजरा करण्यात आला. आंबोली बाजारवाडी येथील राम मंदिरात लघुरुद्र तसेच विविध धार्मिक उत्सव साजरा करण्यात आला.श्री रामांच्या मूर्तीला अभिषेक तसेच विधिवत कार्य करण्यात आले.

आंबोली राघवेश्वर येथील राम मंदिरात ही रामउत्सव साजरा करण्यात आला.तसेच सभामंडप पायाभरणी शुभारंभ करण्यात आला. आंबोली ग्रामदैवत माऊली मंदिरात ही विविध कार्यक्रम करण्यात आले.माऊली मंदिर ते पूर्वीचा वस अशी रॅली काढण्यात आली. त्यानंतर मंदिरात राम नामघोष आणि प्रतिमा प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर पालखी मिरवणूक, महाप्रसाद,हळदीकुंकू ,नाईक दशावतारी नाट्यमंडळ,झरेबांबर यांचा दशावतारी नाट्यप्रयोग करण्यात आला.

आंबोलीत प्रत्येक वाडीत रस्ते रांगोळी,सजावट,दारासमोर भगवा झेंडे लावले.एकंदरीत घरोघरी उत्सवाच्या वातावरणातील तसेच मंदिराकडे धार्मिक वातावरण आंबोलीत “लव कुश” या दशावतारी नाटकाला हीलोकांनी गर्दी केली.यावेळी सर्व कलाकारांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.समाजकल्याण माजी सभापती अंकुश जाधव यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

You cannot copy content of this page