राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बांदा शहरात भव्य रथयात्रेने सोहळ्याचा शुभारंभ…

शेकडो भाविक पारंपारिक वेशभूषेत रथ यात्रेत सहभागी:शहरात ठिकठिकाणी रथ यात्रेचे स्वागत..

⚡बांदा ता.२२-: राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बांदा शहरात भक्तिमय व उत्साहाचे वातावरण आहे. भव्य रथयात्रेने सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेकडो भाविक पारंपारिक वेशभूषेत रथ यात्रेत सहभागी झाले होते.

ढोल ताशांच्या गजरात शहरातून रथ यात्रा काढण्यात आली. यावेळी प्रभु श्री राम, लक्ष्मण, माता सीता, हनुमान यांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या. शहरात ठिकठिकाणी रथ यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी रस्त्यारस्त्यावर महिलानी रांगोळ्या काढल्या आहेत. तसेच विद्युत रोषणाई व पताक्यांची आरास करण्यात आली आहे. बांदेश्वर मंदिर येथे रथयात्रेची समाप्ती करण्यात आली. यावेळी प्रभु श्रीरामांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

You cannot copy content of this page