⚡सावंतवाडी ता.२०-: कोकणातील दशावतार कला ही जगप्रसिद्ध आहे ही लोककला सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी च्या वतीने राजवाडा सावंतवाडी येथे २४ जानेवारी २०२४ ते २७ जानेवारी या कालावधीमध्ये सायंकाळी ६.३० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत ‘दशावतार महोत्सवाचे’ आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उदघाटन बुधवार दि. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात येणार आहे.
या महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, युवराज्ञी सौ. श्रध्दाराजे भोंसले, संस्थेचे संचालक प्रा.डी.टी.देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, नियामक मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत आदि उपस्थित राहाणार आहेत.
दशावतार महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून जिल्ह्यातील विविध दशावतारी मंडळाना व कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रभारी प्राचार्य एम. ए. ठाकूर, प्रा. दिलीप गोडकर, डॉ. बी.एन. हिरामणी, डॉ. गणेश मर्गज, प्रा. बाळासाहेब नंदीहळळी, राजेंद्र बिर्जे, अण्णा देसाई व बाळू धुरी आदी उपस्थित होते.
राजवाडा येथे २४ जानेवारी रोजी ‘दशावतार महोत्सव’…
