हळवल येथील समीरगुरव यांचे निधन…

⚡कणकवली ता.१८-:
हळवल येथील रहिवासी समीर सुभाष गुरव ( वय 35 रा. हळवल -गुरववाडी ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. अतिशय मनमिळावू स्वभावाची व्यक्ती म्हणून समीर परिचित होते. त्यांच्या पश्चात आई, बहीणी, भावोजी, भाची, काका काकी, चुलत भाऊ असा परिवार आहे. समीर हे आमदार वैभव नाईक यांच्या जवळ चालक म्हणून काम करत होते. तर हळवल माजी सरपंच दिपक गुरव यांचे ते बंधू होत.

You cannot copy content of this page