माजी नगरसेवकांकडून भरभरून कौतुक: असे तरुण नेतृत्व कोकणात उद्यास येण्याची गरज…
⚡सावंतवाडी ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पक्षातील नेत्यांनी मंत्रीपदे भूषवली परंतु ते बेरोजगारांसाठी रोजगार नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केलेले दिसले नाही. जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी दिशा देण्याच्या दृष्टीने भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी सावंतवाडी रोजगार मेळावा घेऊन खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गातील बेरोजगारी मुक्त करण्याचे उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे असे तरुण नेतृत्व कोकणात उद्यास येण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री उमेश कोरगावकर,श्री उमाकांत वारंग, माजी नगरसेवक श्री सुरेश भोगटे, श्री विलास जाधव यांनी व्यक्त केले.
दरम्यान श्री विशाल परब यांनी सावंतवाडी सिंदूरत्न महाजॉब फेअर हा उपक्रम राबवून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केले आहेत या उपक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी व उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन त्यांच्या उपक्रमाचे आभार व्यक्त केले.
याबाबत दिलेल्या त्यांनी पत्रकात असे नमूद केले की विशाल परब व त्यांच्या टीमने चांगल्या पद्धतीने नीटनेटके रोजगार मिळायचे नियोजन केले.या मेळाव्यातून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना विविध कंपन्या नियुक्तीची पत्रे देण्यात आली. त्यामुळे उमेदवारांचा चेहऱ्यावर आनंद दिसून आला. सामाजिक कार्याबरोबर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष पद सांभाळत त्यांनी बेरोजगारांच्या जटिल असलेला प्रश्न मुक्त करण्याच्या दृष्टीने त्यांनी उचललेले पाऊल खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांनी राबवलेल्या उपक्रमाचे आम्ही माजी नगरसेवक समर्थ करीत आहोत, असे नेतृत्व कोकणवासीयांना गरज आहे. जिल्ह्यातील गेल्या 35 वर्षात अनेक पक्षाच्या नेत्यांनी मंत्रीपदी आमदार पदे भूषवली परंतु त्यांनी आपली पदे सांभाळत पलीकडे जिल्ह्यातील बेरोजगारांच्या जलंत असलेल्या नोकरीच्या प्रश्न सोडवण्यास ते पूर्ण फेल ठरले मात्र युवा नेतृत्व श्री विशाल परत यांनी सामाजिक बेरोजगारासाठी प्रश्न मुक्त करण्याचा प्रयत्न केला,त्याबद्दल आम्ही माजी नगरसेवक आभार व्यक्त करीत आहोत अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक उमाकांत वारंग, श्री उमेश कोरगावकर, श्री सुरेश भोगटे,विलास जाधव ,यांनी व्यक्त केले.
