⚡वेंगुर्ले ता.१८-: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा नेते विशाल परब यांनी रेडी येथील विविध गरजू व्यक्तींना ३० हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
विशाल परब यांनी रेडी येथील वेदिका विनायक शेटकर याना घरदुरुस्तीसाठी १० हजार, मानसी सगुण सातोस्कर यांना घरदुरूस्थिसाठी १५ हजार, आर्या संजय राऊत हिला पदवीधर शिक्षणासाठी ५ हजार अशी एकूण ३० हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. ही मदत रेडी सरपंच रामसिंग राणे यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
